News Flash

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी हिरे व्यापाऱ्याने दिली ११ कोटीची देणगी

सूरतमधील महेश कबूतरवाला यांनी सुद्धा राम मंदिरासाठी मोठी देणगी दिलीय.

अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी गुजरात सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयाची देणगी दिली. गोविंदभाई ढोलकीया या हिरे व्यापाऱ्याने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात ही देणगी दिली. अयोध्येतील राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आजपासून देणगी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

गोविंदभाई ढोलकीया हे रामकृष्ण डायमंड कंपनीचे मालक आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून गोविंदभाई आरएसएसशी संबंधित आहेत. गोविंदभाई १९९२ सालापासून राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी ११ कोटी रुपयांची देणगी दिली. राम मंदिरासाठी इतकी प्रचंड देणगी देणारे गोविंदभाई एकटे नाहीत. सूरतमधील महेश कबूतरवाला यांनी राम मंदिरासाठी पाच कोटीची देणगी दिली आहे.

पाहा फोटो >> असं असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर! पाच प्रवेशद्वार, पाच कळस, १६१ फूट उंची

लवजी बादशाह यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिलीय. गुजरातमधून अनेक व्यापाऱ्यांनी राम मंदिरासाठी पाच ते २१ लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे गोरधन झाडाफीया आणि सुरेंद्र पटेल यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वप्रथम देणगी दिली असे विहिपचे आलोक कुमार यांनी सांगितले. “ते देशाचे पहिले नागरिक आहेत. म्हणून मोहिम सुरु करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो” असे आलोक कुमार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 3:30 pm

Web Title: diamond trader from surat donates rs eleven crore for ram temple construction in ayodhya dmp 82
Next Stories
1 WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे; सरकारने नोंदवला आक्षेप
2 नव्या कृषी कायद्यांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले…
3 Made in China लसीचा ब्राझीलला दणका, भारतात लसीसाठी विमान पाठवण्याची तयारी; पण मोदी सरकार म्हणालं…
Just Now!
X