News Flash

THE PANAMA PAPERS : करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीय कंपन्या, अमिताभ, ऐश्वर्यासह अनेकांची नावे

पनामामधील 'मोझॅक फॉन्सेका' फर्मकडील एक कोटी दस्तावेजांचा अभ्यास

गेल्याच वर्षी 'स्वीस लिक्स'च्या माध्यमातून काळ्या पैशांसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती 'इंडियन एक्स्प्रेस'ने उघडकीस आणली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पनामा पेपर्सच्या माध्यमातून जगभरातील सेलिब्रिटींची बनवेगिरी उघडकीस आणण्यात आली आहे.

जगभरातील नामवंतांनी आणि सेलिब्रिटींनी करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीयपणे कंपन्या स्थापन केल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोध पत्रकारितेतील संस्थांनी विविध कागदपत्रांच्या आधारे उघडकीस आणले आहे. या यादीतील नावांमुळे जगभरात अनेकांना धक्का बसला आहे. यादीतील भारतीय नावांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन, डीएलएफचे प्रवर्तक के पी सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत यांचासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यादीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावेही आहेत.
गेल्याच वर्षी ‘स्वीस लिक्स’च्या माध्यमातून काळ्या पैशांसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पनामा पेपर्सच्या माध्यमातून जगभरातील सेलिब्रिटींची बनवेगिरी उघडकीस आणण्यात आली आहे.
पनामामधील ‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदेविषयक फर्मकडील सुमारे एक कोटी दहा लाख दस्तावेजांचा आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ अभ्यास केल्यानंतर विविध माहिती आणि नावे पुढे आली आहेत. यादीमध्ये ज्यांची नावे आहेत. त्यांनी या फर्मला स्वतःबद्दल गोपनीयता बाळगण्यासाठी पैसे दिल्याचे उघडकीस आले आहे. या फर्मच्या माध्यमातून परदेशात करचुकवेगिरीसाठी कंपन्या, फाउंडेशन्स आणि ट्रस्ट स्थापन करण्यात आले. यादीमध्ये एकूण ५०० पेक्षा जास्त भारतीयांचा समावेश आहे. यापैकी ३०० जणांच्या पत्त्यांबद्दल इंडियन एक्स्प्रेसने खातरजमा केली आहे.
ऐश्वर्या बच्चन
ऐश्वर्या बच्चन, तिचे वडील कृष्णराज राय, तिची आई वृंदा कृष्णराज राय आणि भाऊ आदित्य राय यांनी २००५ मध्ये ब्रिटिश व्हर्जन आयलंडमधील अमिक पार्टनर्स लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणून नोंदणी केली. त्यानंतर ऐश्वर्या या कंपनीची भागधारक म्हणून दाखविण्यात आली. २००८ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली.
अमिताभ बच्चन
परदेशातील चार शिपिंग कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन संचालक म्हणून दाखविण्यात आले होते. त्यापैकी तीन कंपन्या या बहामामध्ये होत्या. १९९३ मध्ये या कंपन्यांची स्थापन करण्यात आली. या कंपन्यांचे अधिकृत भांडवल ५ ते ५० हजार डॉलर इतके दाखविण्यात आले.
समीर गेहलोत
समीर गेहलोत यांनी लंडनमधील कमीत कमी तीन महत्त्वाच्या मालमत्ता कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांच्या माध्यमातून मिळवल्या. या मालमत्तांची मालकी सध्या एसजी फॅमिली ट्रस्टकडे आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये या ट्रस्टची स्थापन करण्यात आली.
के पी सिंग
के पी सिंग यांनी ब्रिटिश व्हर्जन आयलंडमध्ये नोंदणी केलेली एक कंपनी २०१० मध्ये ताब्यात घेतली. यामध्ये त्यांची पत्नी इंदिरा या सुद्धा भागधारक म्हणून दाखवण्यात आल्या. त्यांचा मुलगा राजीव सिंग आणि मुलगी पिआ सिंग यांनी २०१२ मध्ये आणखी दोन कंपन्या स्थापन केल्या. सिंग कुटुंबियांच्या मालकीच्या परदेशातील कंपन्यांची मालमत्ता एक कोटी डॉलर इतकी आहे.
ब्लादिमीर पुतिन आणि नवाज शरीफ
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि माजी पंतप्रधान बेनेझीर भुट्टो यांनीही करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीयपणे कंपन्या स्थापन केल्याचे कागदपत्रातून उघडकीस आले आहे. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिनही यांचेही नाव यादीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्य नावे
यादीमध्ये गरवारे कुटुंबियातील अशोक गरवारे, आदित्य गरवारे, सुषमा गरवारे यांच्या सोबत शिशिर बजोरिया, ओंकार कंवर, राजेंद्र पाटील, हरिष साळवे, जहांगीर सोराबजी, मोहनलाल लोहिया, जवेरे पूनावाला, अनिल साळगावकर, तब्बसुम आणि अब्दुल रशिद मीर यांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 10:23 am

Web Title: dians in panama papers list amitabh bachchan kp singh aishwarya rai
Next Stories
1 पठाणकोटच्या तपास अधिकाऱ्याची हत्या
2 जीएसटी लवकरच लागू होणार!
3 सीरियात अटक केलेले चार जण भारतात परतणार – सुषमा स्वराज
Just Now!
X