‘आपल्याला राजकारणात येण्याची इच्छा कधीच नव्हती, पण आता मी राजकारणाचा भाग असल्याने लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केले.

एका विद्यार्थ्यांने त्यांना ‘तुम्ही राजकारणी झाला नसतात तर कोण होणे पसंत केले असते’, असा प्रश्न विचारला होता. आणखी एका प्रश्नावर त्यांनी सांगितले, की ‘एनसीसी छात्र असताना एकदा पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या  पक्ष्याला वाचवण्यासाठी मी एनसीसी शिबिरावेळी झाडावर चढलो होतो, त्या वेळी गैरसमजातून शिक्षेची शक्यता होती पण शिक्षा झाली नाही, उलट नंतर माझ्या कृतीचे कौतुकच झाले.’