X
X

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या विमानामधला फरक समजून घ्या…

READ IN APP

तब्बल २६ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांच्या विमानामध्ये बदल होणार आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विमानाला एअर फोर्स वन म्हटलं जातं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला एअर इंडिया वन म्हणतात. या दोन्ही विमानामधला फरक समजून घ्या.

हवेतील उडता किल्ला
अत्याधुनिक संचार उपकरणे असलेले एअर इंडिया वन विमानाला हवेतील उडता किल्ला म्हटले जाते.

मिनी व्हाईट हाऊस
डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘एअर फोर्स वन’ हवेतील चालते-फिरते व्हाइट हाऊस आहे. या विमानात बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातल्या कुठल्याही भागात संपर्क साधू शकतात. अमेरिकेवर हल्ला झाल्यास मोबाइल कमांड सेंटरसारखा या विमानाचा वापर करु शकतात.

अ‍ॅडव्हान्स सिस्टिम
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याच्यावेळी एअर इंडिया वन मिनी पीएमओमध्ये बदलून जाते. अत्याधुनिक संचार उपकरणे या विमानामध्ये आहेत. तेच एअर फोर्स वन अत्याधुनिक आणि सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टिमने सुसज्ज आहे. अमेरिकेवर हल्ला झाल्यास मोबाइल कमांड सेंटरसारखा या विमानाचा वापर करु शकतात.

एअर फोर्स वन फक्त राष्ट्राध्यक्षांसाठी
एअर इंडिया वनचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान वापर करतात. पण एअर फोर्स वन फक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी राखीव आहे. आता पंतप्रधानांसाठी खास विमानाची निर्मिती सुरु आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी एअर फोर्स वनची दोन विमाने आहेत. एक परदेश दौऱ्यावर असताना दुसरे स्टँण्ड बाय असते.

बोईंग ७००-३००ईआर
बोईंग ही अमेरिकन कंपनी आपल्या डलास येथील प्लँटमध्ये भारतीय पंतप्रधानांसाठी बोईंग ७००-३००ईआर विमान बनवत आहे. या विमानामध्ये जगातील सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था असेल. मिसाइल सिस्टिमसह मिसाइल हल्ला फेल करणारी यंत्रणा या विमानात असेल. इन्फ्रारेड काउंटर मेजरसह सेल्फ प्रोटेक्शन सूट या विमानामध्ये असेल.

२६ वर्षानंतर बदलणार भारतीय पंतप्रधानांचे विमान
गेल्या २६ वर्षांपासून एअर इंडिया वन पंतप्रधानांच्या सेवेमध्ये आहे. यावर्षी जुलै महिन्यात बोईंग कंपनीने बनवलेले खास ७००-३००ईआर विमान भारतात दाखल होईल. मागच्यावर्षीच बोईंगने या दोन विमानांची डिलिव्हरी केली होती. पण विमानाला सुरक्षा कव्हरची जोडणी करण्यासाठी पुन्हा हे विमान अमेरिकेला पाठवण्यात आलं.

24
X