जाहीर सभा आणि मेळाव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याबद्दल द्रमुकने सत्तारूढ अभाअद्रमुकवर सडकून टीका केली आहे. तामिळनाडू मुस्लीम मुनेनत्र कळहम पक्षाला मेळावा आयोजित करण्याची परवानगी नाकारण्याचा सत्तारूढ पक्षाचा निर्णय हे मुस्लीम समाजावर सूड उगविण्यात येत असल्याचे उत्तम उदाहरण आहे, असे द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी म्हटले आहे. तामिळनाडू मुस्लीम मुनेनत्र कळहम पक्षाने शनिवारी एक मेळावा आयोजित करण्याचे ठरविले होते. मात्र अभाअद्रमुकने त्यासाठी परवानगी नाकारली. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा हा सरकारचा प्रकार असल्याची टीका करुणानिधी यांनी केली.