News Flash

आधार कार्डामुळे खासगी माहितीला कोणताही धोका नाही – बिल गेट्स

आधार कार्डामुळे कोणाच्याही खासगी माहितीला कुठलाही धोका नाहीय असे मत मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केले आहे.

आधार कार्डामुळे कोणाच्याही खासगी माहितीला कुठलाही धोका नाहीय असे मत मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केले आहे. उलट आधार कार्ड योजनेची दुसऱ्या देशात अंमलबजावणी व्हावी यासाठी बिल आणि मेलिंडा गेटस फाऊंडेशनकडून वर्ल्ड बँकेला निधी पुरवण्यात येत आहे. भारतातील आधार कार्ड योजनेचे शिल्पकार नंदन नीलकेणी या प्रकल्पासाठी वर्ल्ड बँकेला मदत करत आहेत.

आधार कार्डाचे भरपूर फायदे आहेत असे गेट्स म्हणाले. भारताच्या शेजारी देशांनीही त्यांच्या देशात आधार योजना लागू करायची आहे त्यासाठी त्यांनी भारताकडे मदत मागितली आहे. आधार फक्त बायो आयडी व्हेरीफिकेशन योजना आहे. आधारामुळे व्यक्तिगत माहितीला कुठलाही धोका नाही असे गेट्स म्हणाले.

नोव्हेंबर २०१६ मध्ये निती आयोगाने ‘परिवर्तनासाठी तंत्रज्ञान’ या विषयावर गेट्स यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते कि, आधारसारखी योजना कुठल्याही देशाने आणलेली नाही. अगदी श्रीमंत देशांना सुद्धा हे जमलेले नाही. जगातील सर्वात मोठी बायोमेट्रीक आयडी सिस्टिम असलेल्या आधार योजनेत भारतात अब्जावधीपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. यूआयडीएआयकडे सगळा डाटा जमा होतो. भारत सरकारने जानेवारी २००९ मध्ये या यंत्रणेची स्थापना केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:20 pm

Web Title: does not pose any privacy risk from aadhaar bill gates
Next Stories
1 रेल्वेच्या ऑनलाइन तिकिटाचेही बोर्डिंग स्टेशन बदलता येणार
2 अजब रेल्वे स्थानक… अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा गुजरातमध्ये!
3 बिदरमध्ये दलित मुलीचा छळ झाला तेव्हा काँग्रेसच्या कँडल कुठे गेल्या होत्या ? – नरेंद्र मोदी
Just Now!
X