31 October 2020

News Flash

डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटवर येणार – गुजरात मुख्यमंत्री

"संपूर्ण आशियामध्ये साबरमती नदी सर्वात स्वच्छ आहे"

या स्टेडियमचं उद्घाटन अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देतील अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

“संपूर्ण आशियामध्ये साबरमती नदी सर्वात स्वच्छ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झाले. जपान आणि इस्रायलचे पंतप्रधान सुद्धा साबरमती रिव्हरफ्रंटवर आले होते. त्यांना सुद्धा नदीची स्वच्छता पाहून आश्चर्य वाटले” असे रुपानी म्हणाले. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येतील. तेव्हा, ते सुद्धा रिव्हरफ्रंटला भेट देतील”. ट्रम्प नेमके कधी भारतात येणार ते रुपानी यांनी स्पष्ट केलेले नाही.

२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान ट्रम्प भारतात येण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मागच्यावर्षी भारताने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ट्रम्प यांना निमंत्रण दिले होते. पण त्यावेळी त्यांना शक्य झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 10:38 am

Web Title: donald trump to visit sabarmati riverfront during india trip in february gujarat cm dmp 82
Next Stories
1 इस्त्रोच्या मदतीनंतरही ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही; भाजपाचं काँग्रेसच्या वर्मावर बोट
2 चीनमधील Google ची सर्व कार्यालये बंद
3 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?
Just Now!
X