अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात झालेल्या अपघातामुळे ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चौडा बाजार परिसर भागात दसरा असल्याने रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. रावण दहन करतानाच ही दुर्घटना घडली. अनेक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. पंजाब येथील चौडा बाजार परिसरात हा घटना घडली. या दुर्घटनेनंतर कारमध्ये बसून नवज्योत कौर सिद्धू तिथून निघून गेल्या असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला. तसेच अनेकांनी नवज्योत कौर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. मात्र मी त्या कार्यक्रमात गेले होते आणि मी तिथून निघाल्यावर पंधरा मिनिटांनी हा अपघात झाला. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना आणि मृत्यूंचं राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे.

मला या दुर्घटनेबाबत जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मी तातडीने रुग्णालयांमध्ये आली आहे. मी इथे रूग्णांचे सांत्वन करते आहे. सकाळपर्यंत मी इथेच थांबणार आहे. माझ्यावर आरोप कणाऱ्यांना आणि माझ्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे.  एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्यावरचे सगळे आरोप खोडून काढले आहेत. अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यही सुरू करण्यात आले आहे.