अत्यंत संवेदनक्षम अशा संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) संगणक हॅक करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. चीनच्या हॅकर्सकडून हे कृत्य घडल्याचा संशय असून काही संवेदनक्षम माहितीही त्यांनी मिळविली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुप्तचर यंत्रणा याबाबत तपास करीत असल्याने सध्या आपण त्याबाबत कोणतेही भाष्य करू इच्छित नसल्याचे संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांनी म्हटले आहे.
आमच्या माहितीनुसार कोणताही संगणक अथवा डीआरडीओची प्रणाली हॅक करून त्यामधून माहिती मिळविण्यात आली नसल्याचे डीआरडीओचे प्रवक्ते रवी गुप्ता यांनी म्हटले आहे.