20 September 2020

News Flash

गोव्यात खुलेआम मद्यपान कारागृहास पात्र

कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा उपाय

| May 5, 2017 01:15 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा उपाय

देशी आणि परदेशी नागरिकांच्या मुक्तवावरासाठी आणि मद्यशौकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे प्यालेबहाद्दरांना आता थेट तुरुंगाची सहल घडविणार आहेत.  गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास थेट कारागृहाची हवा खावी लागणार आहे. उघडय़ावर सर्वासमक्ष मद्यपान करणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश पोलीस दलाने दिले आहेत. सर्वसाधारण नागरिक, पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी आणि पोलीस यांची कलंगुट पोलीस ठाण्यात बैठक झाल्यानंतर वरील आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला जवळपास ६०-७० जण हजर होते.

सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यपान करीत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी म्हणजे कारवाई करणे सोपे होईल, असे आवाहन कश्यप यांनी जनतेला केले आहे. रात्रीच्या वेळी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करीत असल्याच्या प्रकारांबद्दलही या बैठकीत चर्चा झाली.

कारण काय?

येथील पर्यटक आणि स्थानिक उघडपणे मद्यपान करतात आणि त्यानंतर भांडणे आणि हाणामाऱ्या निर्माण झाल्यास मद्याच्या बाटल्या फोडून एकमेकांवर प्रहार करतात. निव्वळ पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना या प्रकाराने त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे  उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:15 am

Web Title: drinking ban in public places at goa
Next Stories
1 पिपात प्याले ओल्या उंदीर..
2 ‘या’ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला तुरुंगात घ्यायची आहे अबू सालेमची भेट
3 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करणार सौदी, इस्त्रायलचा दौरा
Just Now!
X