दुबईच्या सुलतानांचे चिरंजीव शेख रशीद बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांचे वयाच्या ३३व्या वर्षी निधन झाले. ते हृदयविकाराने मरण पावल्याचे वृत्त संयुक्त अरब अमिरातीच्या ‘व्ॉम’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. शेख रशीद हे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम आणि त्यांची ज्येष्ठ पत्नी शेखा हिंद बिंत मक्तूम बिन जुमा अल मक्तूम यांचे पहिले पुत्र होते. दुबईचे राज्यकर्ते या भूमिकेशिवाय ते संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष व पंतप्रधानही होते. ते उत्कृष्ट खेळाडू आणि घोडेस्वारीचे शौकीन होते. त्यांचा लहान भाऊ शेख हमदान हा दुबईचा राजपुत्र आहे.