अंदमान बेटांच्या समुहाला बुधवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. जमीनीपासून १० किलोमीटर आतमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.

मागील चार दिवसांमध्ये भारतातील शहरांमध्ये जाणवलेला हा तिसरा भूकंप आहे. काल दिल्लीमध्येही २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवलेला. दुपारी पाऊणे चारच्या सुमारास झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीपासून १७ किलोमीटर आतमध्ये होता. तर एक जुलै रोजी हरियाणातील सोनपत येथे ४ रिश्टर स्केलचा मध्यम स्वरूपाचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. या भूकंपाचे धक्के अगदी दिल्ली आणि दिल्ली एनसीआर परिसरातही जाणवले होते. आज अंदमान बेटांजवळ झालेला भूकंपही अशाच मध्यम स्वरूपाचा होता.