आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जूनपासून खुला होणार आहे. पॅरीसमध्ये आयफेल टॉवर आहे. करोनाच्या संकटामुळे आयफेल टॉवर पर्यटकांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. आता आयफेल टॉवर पर्यटकांसाठी २५ जून पासून खुला होणार आहे AFP ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एएनआयने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

आयफेल टॉवरच्या पायऱ्या खुल्या करण्यात येतील. एलिव्हेटर सुरु करण्यात येणार नाही. पर्यटकांनी आयफेल टॉवर पाहण्यासाठी येताना सुरक्षित अंतर ठेवणं हे सक्तीचं असणार आहे असं आयफेल टॉवरच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलं आहे. आयफेल टॉवरची सर्वात उंच बाजू ही बंदच राहणार आहे.

आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये करण्यात आली. पॅरीसमधल्या सर्वाधिक उंच टॉवरमध्ये आयफेल टॉवरची गणना केली जाते. या टॉवरची उंची ३२४ मीटर आहेत. एखाद्या ८१ मजली इमारतीएवढी या टॉवरची उंची आहे. या टॉवरच्या तीन लेव्हल आहेत. या तीन लेव्हल्सला पर्यटक भेट देऊ शकतात. या टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हलवर रेस्तराँ आहेत. २७६ मीटरवर म्हणजेच ९०६ फुटांवर या टॉवरची तिसरी लेव्हल आहे. या ठिकाणाहून पर्यटकांना निरीक्षण करता येतं. आयफेल टॉवरला दरवर्षी साधारण ७ लाख पर्यटक भेट देतात.