News Flash

पाकिस्तानात आत्मघातकी हल्ल्यात ८ ठार

एका आत्मघातकी हल्लेखोराने घडविलेल्या स्फोटात किमान सात जण ठार झाले

पाकिस्तानातील सत्तारूढ पीएमएल-एन पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या पंजाब प्रांतातील निवासस्थानाबाहेर बुधवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने घडविलेल्या स्फोटात किमान सात जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. मात्र सदर लोकप्रतिनिधी या हल्ल्यातून बचावला.

जेरा गाझी खान जिल्ह्य़ातील तौनसा शरीफ येथे पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचे सदस्य सरदार अमजद खोसा यांचे निवासस्थान आहे. आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडविला त्यावेळी तेथे जवळपास २० ते २५ जण, मुख्यत्वे पक्ष कार्यकर्ते हजर होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2015 12:03 am

Web Title: eight people dead in pakistan attack
टॅग : Pakistan Attack
Next Stories
1 नेताजींच्या जन्मदिनी त्यांच्याबाबतची कागदपत्रे खुली करणार- मोदी
2 देशाच्या एकात्मतेसाठी समान नागरी कायदा आवश्यक – सदानंद गौडा
3 ‘इन्फोसिस’मध्ये २००० जणांची पदोन्नती, १०० टक्के व्हेरिएबल पे-आऊटही!
Just Now!
X