25 February 2021

News Flash

दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचा गोळीबार, चकमक सुरु

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील चानकीत्तार गावात सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील चानकीत्तार गावात सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोध मोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवर हल्ले सुरुच आहेत. मागच्या आठवडयात जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे जमावाने केलेल्या दगडपेकीत एक जवान शहीद झाला. राजेंद्र सिंह (वय २२) असे त्या जवानाचे नाव असून तो लष्करात शिपाई पदावर कार्यरत होता.

अनंतनाग येथे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या ताफ्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकात राजेंद्र सिंह याचा समावेश होता. गुरुवारी हा ताफा अनंतनागमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ येथून जात असताना काही तरुणांनी ताफ्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत राजेंद्र सिंह हा जवान जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र सिंह हा मूळचा उत्तराखंडचा असून तो लष्करात शिपाई होता. बोदना गावातील रहिवासी असलेला राजेंद्र सिंह हा २०१६ मध्ये लष्करात भरती झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 2:35 pm

Web Title: encounter breaks out between security forces and terrorists in kashmir
Next Stories
1 भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत ८०० फुट खोल दरीत पडल्याने दुर्देवी अंत
2 करवाचौथला केला उपवास आणि मग केली पतीची हत्या
3 नक्षलवादी हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू
Just Now!
X