आंध्र प्रदेशातील एका पायाभूत प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ८६३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर बुधवारी महसूल संचालनालयाने टांच आणली. मनी लॉण्डिरग प्रकरणात करण्यात आलेली ही सर्वात मोठी फौजदारी कारवाई आहे.
वाय. एस. राजशेखर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जगनमोहन आणि एन. प्रसाद यांच्या कंपन्यांवर वदारेवू आणि निजामपट्टणम येथील औद्यौगिक प्रकल्पाबाबत मेहेरनजर केली, त्या संदर्भात संचालनालयाने जगनमोहन आणि प्रसाद यांच्यावर स्वतंत्र नोटिसा बजाविल्या.
या प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदविला त्या आधारे संचालनालयाने २०१२ मध्ये मनी लॉण्डिरग प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी चौकशी सुरू केली होती.
दरम्यान, या कारवाईप्रकरणी राज्यातील राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू होती.