27 February 2021

News Flash

वर्क फ्रॉम होमचा तणाव सहन होईना, इंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या

राहत्या घरात संपवलं जीवन

करोनामुळे लॉकडाउन लागला आणि सर्वांवरच घरुन काम करण्याची वेळ आली. मात्र घरुन काम करताना योग्य सुविधा नसल्याने अनेकांना मानसिक तणाव जाणवत आहे. याच तणावातून एका ३२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या या व्यक्तीने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरुन काम करताना येणारा दबाव सहन न झाल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. गुजरातमध्ये ही घटना घडली आहे.

जिगर गांधी असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. जिगरचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा होणार होता. नोएडा येथील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून तो काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता आणि घरुनच काम करत होता. जिगर गेल्या काही दिवसांपासून घरून काम करावं लागत असल्याने किती तणाव असता याबद्दल सांगत होता अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली आहे. शवविच्छेदन अहलावात गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 9:39 am

Web Title: engineer commit suicide due to work from home pressure in surat sgy 87
Next Stories
1 सर्व दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत – उषा ठाकूर
2 चांगुलपणा: भारतीय हद्दीत भरकटलेल्या चिनी सैनिकाची ‘घर’वापसी
3 गोवा : उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवरुन Whatsapp Group वर पोस्ट झाला अश्लील व्हिडीओ
Just Now!
X