यंदाच्या वर्षीचा सुपरमून या आठवडय़ाच्या अखेरीस दिसला. सुपरमून याचा अर्थ चंद्र हा पृथ्वीच्या अधिक जवळ येतो त्यामुळे तो मोठा व प्रकाशमान दिसतो. पूर्ण चंद्राच्या रात्री हा परिणाम जास्त चांगला दिसून येतो, असे नासाने म्हटले आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर बदलते याचे कारण म्हणजे तो वर्तुळाकार कक्षेऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. यंदाच्या वर्षी सुपरमून १४ टक्के मोठा व ३० टक्के अधिक प्रकाशमान दिसला.