देशाच्या एकतेला आपलं प्राधान्य राहिल अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी तसेच याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चौरी-चौरा शताब्दी महोत्सवानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एका टपाल तिकीटाचे उद्घाटन करण्यात आले.

मोदी म्हणाले, “देशाच्या एकतेला आपलं प्राधान्य राहिल अशी शपथ सर्वांनी घ्यायला हवी तसेच याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा. याच भावनेनं आपल्याला देशातील प्रत्येक व्यक्तीसोबत पुढे जायचं आहे.”

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनाच्या आंतरराष्ट्रीय चर्चेमुळं भारताच्या प्रतिमेला तडा जाणार नाही – संजय राऊत

“करोनाच्या काळात देशाच्यासमोर जी आव्हानं होती, त्यावर तोडग्यासाठी यंदाचं बजेट नवा वेग देईल. अनेक दशकांपासून आपल्या देशात कोणाच्या नावाने काय घोषणा केली इतकाच बजेटचा अर्थ राहिला होता. बजेटला वोट बँकेच्या हिशोबाची वही बनवून ठेवलं होतं,” अशा शब्दांत मोदींनी बजेटवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केलं.

आणखी वाचा- कोणताही अपप्रचार भारताचे ऐक्य धोक्यात आणू शकत नाही – अमित शाह

शेतकऱ्यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “जर आपला शेतकरी अधिक सशक्त झाला तर कृषी क्षेत्रात होत असलेली प्रगती आणखी वेग घेईल, यासाठी बजेटमध्ये अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. बाजार शेतकऱ्यांच्या फायद्याचा व्हावा यासाठी १००० आणखी बाजारांना ई-नामशी जोडण्यात येणार आहे.”