काँग्रेसेचे दिग्गज नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदींना ‘सपनों का सौदागर’ असं म्हटलं आहे. तर, मीडिया गोदी मीडिया असे देखील ते म्हणाले आहेत. याशिवाय, सर्व काही अगोदरपासून स्क्रिप्टेड असल्याचं सांगत, त्यांनी आरोप केला की लोकं सरकारच्या अपयशावर प्रश्न उपस्थित करू नये, यासाठी मीडियाच्या माध्यमातून स्क्रिप्टेड मुद्दे चर्चेत आणले जात आहेत.
“सर्व काही पहिल्यापासूनच स्क्रिप्टेड आहे…करोना जास्त झाला तर सुशांत-सुशांत…चीनने आपले जवान मारले तर रिया-रिया… जीडीपी -२३ टक्के झाला तर कंगना-कंगना …शेतकरी रस्त्यांवर उतरला तर दीपिका-दीपिका… मोदींना “सपनों का सौदागर” यासाठीच तर म्हणतात #गोदिमीडिया” असं दिग्विजय सिंह यांनी ट्विट केलं आहे.
“सब कुछ पहले से ही स्क्रिप्टेड है…
कोरोना ज्यादा हुआ तो
“सुशांत-सुशांत”चीन ने हमारे जवान मारे तो
“रिया-रिया”GDP -23% हुई तो
“कंगना-कंगना”किसान सड़को पर तो
“दीपिका-दीपिका”मोदी जी को “सपनों का सौदागर”
इसीलिए तो कहते हैं।”#गोदिमीडिया— digvijaya singh (@digvijaya_28) September 26, 2020
आणखी वाचा- “…त्याचप्रमाणे शिरोमणी अकाली दलाच्या एका बॉम्बनं मोदी सरकार हादरलंय”
याचबरोबर आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणतात, करोनामुळे रोज शेकडो लोकं मरत आहेत. एवढच नाहीतर केंद्रीयमंत्री व खासदार मरत आहेत. मात्र, वृत्तवाहिन्यांना अभिनेत्रींची पडलेली आहे.
कोविड से एक केंद्रीय राज्य मंत्री की मौत हो गयी।
दो केंद्रीय मंत्री अस्पताल में हैं।
उत्तर प्रदेश में दो मंत्रियों की मौत हो चुकी है। अस्पताल में बेड नहीं मिल रहे हैं।
और tv चैनलों की खबर है कि किस
हीरोइन ने कौन सा नशा किया।
#गोदिमीडिया— digvijaya singh (@digvijaya_28) September 25, 2020
“करोनामुळे एका केंद्रीय राज्यमंत्र्याचा मृत्यू झाला. दोन केंद्रीयमंत्री रुग्णालयात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दोन मंत्र्यांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत आणि टीव्ही चॅनलवर बातमी आहे की कोणत्या अभिनेत्रीने कोणती नशा केली.” अशा शब्दांमध्ये त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला आहे. सोबतच #गोदिमीडिया असं देखील जोडलं आहे.