भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना २०१९ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून प्रयत्न केल्याबद्दल बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.  हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. अभिजित यांच्याबरोबरच त्यांची पत्नी इस्थर डफलो आणि सहकारी मायकल क्रेमर या या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रायोगिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांचा हा गौरव असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. जाणून घेऊयात कोण आहेत अभिजित बॅनर्जी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • अभिजित बॅनर्जी यांचा जन्म २१ फेब्रवारी १९६१ रोजी मुंबईमध्ये झाला.
  • कोलकत्ता येथील सेंटर फऑर स्टडीज इन सोशल सायन्समध्ये अभिजित यांची आई निर्माला या प्राध्यापक होत्या. तर वडील दिपक हे कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
  • सध्या ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) फोर्ड फाऊण्डेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
  • अभिजित हे ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’चे संस्थापक आहेत. इस्थर डफलो आणि सेंडील मुल्लीनाथन यांच्या सोबतीने बॅनर्जी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील संसोधन ही संस्था करते.
  • अभिजित यांनी १९८१ साली आपली अर्थशास्त्रमधील बीएस पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनातर त्यांनी १९८३ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामधून एमएची पदवी घेतली. त्यानंतर १९८८ साली ते पीएचडी करण्यासाठी हार्वर्ड विद्यापिठात गेले.
  • हार्वर्ड विद्यापीठ आणि प्रिन्सटॉन विद्यापिठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर आता ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात.
  • विकासावादी अर्थव्यवस्था हा अभिजित यांचा कोअर सबजेक्ट आहे. अर्थव्यवस्थेशी आधारित विविध घटकांचा तिच्यावर कसा परिणाम होतो याचा त्यांनी अभ्यास केला आहे.
  • २००४ साली त्यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची फेलोशीप मिळाली.
  • आर्थिक क्षेत्रातील संसोधनासाठी २००९ साली त्यांना इन्फोसेस पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • २०१२ मध्ये अभिजित यांना ‘पूअर इकनॉमिक्स’ या पुस्तकासाठी सह-लेखक एस्तेर ड्यूफलो यांच्यासमवेत ‘जेरल्ड लोब अवॉर्ड’ सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळाला.
  • २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्राचा सरचिटणीस बान की-मून यांनी २०१५ नंतरची विकास उद्दिष्टांसंदर्भात काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीमध्ये अभिजित यांनी नियुक्ती केली होती.
  • २०१९ मध्ये त्यांनी एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडियामार्फत आयोजित एका कार्यक्रमात सामाजिक धोरणांची पुन:बांधणी या विषयावर एक लेक्चर दिले होते.
  • अभिजित यांनी एमएयटीमध्ये प्राध्यापिका असणाऱ्या डॉ. अरुंधती बॅनर्जी यांच्याबरोबर लग्न केले. हे दोघेही बालपणापासून मित्र होते. या दोघांना २० फेब्रुवारी १९९१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. मात्र नंतर अभिजित आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाला. २०१६ साली त्यांचा एकुलता एक मुलगा कबीर याचा आकस्मिक मृत्यू झाला.
  • अभिजित यांनी त्यांची सहकारी इस्थर डफलो यांच्यासोबत २०१५ साली लग्न केले. मात्र त्याआधीपासूनच ते एकत्र राहत होते. २०१२ साली त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ते लग्न बंधनात अडकले.

अभिजित यांनी लिहिलेली पुस्तके

१)
Volatility And Growth

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everything you want to know about economics nobel prize 2019 winner economist abhijit banerjee scsg
First published on: 14-10-2019 at 16:33 IST