07 March 2021

News Flash

गुजरातचे माजी मुख्यमंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यापूर्वी काँग्रेस आणि भाजपामध्ये राहिलेल्या वाघेला यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या आठवडाभरापासून वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी वाघेला यांच्या पक्षप्रवेशाबाबत मुंबईत घोषणा होणार असल्याचंही म्हटलं जात होतं.

शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतरच राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं वाघेला यांनी सांगितलं. ‘याबाबत पवारांशी चर्चा झाली, ही चांगली गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात जनतेच्या मुद्यांना वाचा फोडण्यासाठी एका चांगल्या व्यासपीठाची गरज असतेच आणि कोणालाही अशा गोष्टीसाठी नाही म्हणू नये’, असं वाघेला म्हणाले.

वाघेला यांचा राजकीय प्रवास –
भाजपातून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली, पण 1995 साली गुजरातमध्ये भाजपा सत्तेत आल्यावर त्यांच्याऐवजी केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या पक्षाच्या निर्णयानंतर त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेत 1996 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही मिळालं. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष तसंच गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं. नंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत वाघेला यांनी काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपाला मदत केली होती. आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 9:23 am

Web Title: ex gujarat cm shankarsinh vaghela set to join ncp
Next Stories
1 माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
2 झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
3 मध्य प्रदेश: विवाह सोहळ्यावरून परतणाऱ्या कारला भीषण अपघात, ३ चिमुकल्यांसह १२ जणांचा मृत्यू
Just Now!
X