पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचा मुलगा अली हैदर याला दोन दहशतवादी संघटनांकडून धमक्यांचे फोन येते होते, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलीये. हैदर याचे गुरुवारी मुल्तानमधून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात हैदर याचा सुरक्षारक्षक आणि स्वीय सहायक मृत्युमुखी पडले. तसेच पाच जण जखमी झाले.
पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या लष्करे जांगवी आणि सिपाह ए सहाबा या दहशतवादी संघटनांकडून हैदर याला सातत्याने धमक्यांचे फोन येत होते. तुमची हत्या करू, अशाही धमक्या त्याला देण्यात येत होत्या. हैदर याच्या अपहरणाची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यापैकी दोघांकडे अपहरणाबद्दल बरीचशी माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गिलानी यांच्या पुत्राचे अपहरण