बंगळुरूमधील काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. स्फोट घडवला? की नेमका स्फोट कशाचा झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार, आमदार मुनीरथना यांचे राजेश्वरी नगर येथील घराजवळ रविवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. व्यंकटेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे.