25 September 2020

News Flash

जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन, सकाळी क्रॅश झालं होतं मेसेंजर

जगभरात फेसबुक आणि इंस्टा डाऊन झाल्याची तक्रार समोर

संग्रहित छायाचित्र

फेसबुक मेसेंजर आज सकाळी काही वेळासाठी क्रॅश झालं होतं. त्यानंतर आता फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झालेले पाहण्यास मिळाले. एका अहवालानुसार ब्रिटनमध्ये आणि त्यापाठोपाठ भारतात फेसबुक युजर्स आणि इंस्टा युजर्सना त्यांचे अकाऊंट ऑपरेट करण्यात अडचणी येत आहेत.

”Facebook is down for required maintenance right now, but you should be able to get back on within a few minutes.” असा संदेश अनेक युजर्सना आल्याचीही माहिती समोर येते आहे.

गेल्या पाऊण तासापासून फेसबुक आणि इंस्टा युजर्सना अशा प्रकारचा एरर येतो आहे. काही नेटकरी फेसबुक ओपन करू शकत आहेत मात्र त्यावर पोस्ट करू शकत नाहीत. तर काहींचा फोटो दिसत नाही. गेल्या पाऊण तासापासून फेसबुक आणि इंस्टाचा वेग मंदावल्याची माहिती समोर येते आहे. फेसबुकचे न्यूज फिडही अनेकांच्या प्रोफाईलवर दाखवले जात नाहीये. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला सेवा पुरवू असा संदेश फेसबुक ओपन केल्यावर दिसतो आहे असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

मागील २४ तासांचा विचार करता सुरूवातीला मेसेंजर त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम या तिन्ही सेवा जगभरात डाऊन झाल्या आहेत. डाऊन डिटेक्टरवर सातत्याने जगभरातून फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन असल्याचे सांगत आहेत. काही ठिकाणी लॉग इन करतानाही तक्रारी येत आहेत. फेसबुक मेसेंजर आज सकाळी डाऊन झाले होते. आता त्यापाठोपाठ फेसबुक आणि इंस्टा डाऊन झाल्याचे बघायला मिळते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 7:59 pm

Web Title: facebook and instagram down for some users world wide
Next Stories
1 शीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा
2 मासिक पाळीमुळे घराबाहेर झोपलेल्या मुलीचा ‘गज’वादळात मृत्यू
3 दिल्लीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या हस्तकाला अटक
Just Now!
X