भारतात नमुना चाचण्या कमी केल्या गेल्या असे म्हणणे योग्य होणार नाही, जपानमध्ये एका रुग्णामागे ११.७ जणांची नमुना चाचणी केली गेली. इटलीत हे प्रमाण ६.७, अमेरिका ५.३, ब्रिटनमध्ये ३.४ इतके आहे. त्या तुलनेत भारतात एका रुग्णामागे २४ जणांच्या चाचण्या घेतल्या गेल्या. गेल्या चोवीस तासांमध्ये ३०,०४३ चाचण्या झाल्या त्यापैकी ३७१२ चाचण्या ७८ खासगी प्रयोगशाळांत केल्या गेल्या, अशी माहिती ‘आयसीएमआर’चे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

दिवसभरात दोन सत्रांमध्ये चाचण्या केल्या गेल्या तर दररोज ७८ हजार नमुना चाचण्या करता येऊ  शकतात. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येईल असा कोणताही पुरावा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.