राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचा समाचार घेत पंतप्रधानांनी विविध नेत्यांच्या विधानाचा हवाला दिला. विरोधकांकडून फक्त आंदोलनाबद्दल चर्चा होत आहे. कायद्याच्या मूळ विषयाबद्दल नाही, अशी टीका मोदींनी केली. आंदोलक शेतकऱ्यांकडून होत असलेल्या एमएसपी अर्थात हमीभावाबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं. त्यावरून शेतकरी नेते राकैश टिकैत यांनी मोदींना कायद्या करण्याचं आव्हान दिलं आहे.

कृषी कायदे मागे घ्या, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असून, या मुद्द्यावरून विरोधकांकडूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपी होता आणि कायम राहिल, अशी ग्वाही दिली. त्यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- Farmers Protest: लोकशाहीची मानकं सुरक्षित ठेवा; अमेरिकन खासदारांचा भारताला सल्ला

“एमएसपी संपेल असं आम्ही कधी म्हणालो? आम्ही म्हणालो की, एमएसपी कायदा तयार करायला हवा. जर असा कायदा तयार करण्यात आला, तर देशातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आता एमएसपीबद्दल कोणताही कायदा नाही आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे,” असं म्हणत टिकैत यांनी सरकारला उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- ‘मोदी है मौका लीजिए’ म्हणत पंतप्रधानांनी संपवलं भाषण, कारण…

मोदी काय म्हणाले?

आणखी वाचा- “जवानही नाही, शेतकरीही नाही… मोदी सरकारसाठी उद्योजक मित्रच देव”

“आपल्याला पुढे जायचं आहे. देशाला मागे घेऊन जाऊ नका. सुधारणांना एक संधी द्यायला हवी. काही चुका असतील, तर दुरुस्त करु. विश्वास ठेवा, बाजार समित्या, आडत अधिक सक्षम होतील. एमएसपी आहे. एमएसपी होता… आणि एमएसपी राहिल,” अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी संसदेत भाषण करताना दिली.