जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) मनीलॉण्डरिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला आणि अन्य संबंधितांची ११.८६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘ईडी’ने ‘पीएमएलए’ कायद्यान्वये जम्मू आणि श्रीनगर येथील मालमत्ता जप्त केल्या. त्यामध्ये दोन स्थावर मालमत्ता, एक वाणिज्यिक मालमत्ता आणि अन्य तीन भूखंड यांचा समावेश आहे. त्यांचे बाजारमूल्य ६०-७० कोटी रुपये इतके आहे.