News Flash

बिहारमध्ये मतदान केंद्रावर हाणामारी, जवानांकडून हवेत गोळीबार

चार जणांना अटक; पूर्णिया जिल्ह्यातील घटना

(संग्रहित छायाचित्र)

बिहारमध्ये अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. दरम्यान, पूर्णिया जिल्ह्यातीली धमदाहा विधानसभा परिसरात आज मतदान सुरू असताना, सुरक्षा रक्षकांकडून मतदरांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला.

धमदाह विधानसभा परिसरातील कृत्यानंद नगर ठाण्याच्या हद्दीतील अलीनगर बुथ क्रमांक २८२ वर सीआयएसएफच्या जवानांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांना रांगेत उभा राहताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले होते. यावर काहीजण आक्रमक झाले व त्यांनी जवानांबरोबरच हुज्जत घालण्यास सुरूवात केली. वाद विकोपाला गेला व त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून हवेत गोळीबार करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पूर्णियाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तणाव निवळल्यानंतर मतदान केंद्रावर पुन्हा शांततेत मतदान पार पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 5:09 pm

Web Title: fighting at a polling station in bihar msr 87
Next Stories
1 प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडियांविरोधात ३०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप, FIR दाखल
2 जागतिकीकरण महत्त्वाचं पण आत्मनिर्भर होणंही आवश्यक; IIT च्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचा सल्ला
3 बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी बाबा राम रहीम सिक्रेट पॅरोलवर तुरुंगाबाहेर
Just Now!
X