27 February 2021

News Flash

पंजाबच्या तरनतारन मध्ये स्फोट, २ ठार ११ जण जखमी

या घटनेत जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत

पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात एका धार्मिक यात्रेत झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात २ जण ठार झाले तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. पंजाब पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. तसंच एएनआयनेही या संदर्भातले वृत्त दिले आहे. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर फटाके होते. ज्याचा स्फोट झाला त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सुरुवातीला १४ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. धार्मिक यात्रेदरम्यान अनेक लोक फटाके उडवत होते. त्यावेळी एका फटाक्याच्या ट्रॉलीवर बरेचसे फटाके होते. या फटाक्यांवर एक जळता फटाका पडून हा अपघात झाला अशी माहिती एसपीएस परमार यांनी दिली. हा स्फोट एवढा भयंकर होता की ट्रॉलीही उद्ध्वस्त झाली असंही पोलिसांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 9:14 pm

Web Title: fire crackers explosion during religious procession in punjab 14 dead scj 81
Next Stories
1 …तर राहुल गांधींविरोधात ‘अंडी मारो’ आंदोलन करु-आठवले
2 Delhi Exit poll 2020 : दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार, आपचीच होणार सरशी
3 मासिक पाळी आली असल्याने १४ वर्षीय मुलीचा विवाह वैध, पाकिस्तान न्यायालयाचा निर्णय
Just Now!
X