21 September 2020

News Flash

कैरो येथे निदर्शकांवरील गोळीबारात ९ जखमी

येथील प्रसिद्ध तहरिर चौकात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चावर एका बुरखाधारी बंदूकधाऱ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात ९ निदर्शक जखमी झाले. देशाच्या नवीन घटनेसाठी करण्यात

| December 12, 2012 03:29 am

येथील प्रसिद्ध तहरिर चौकात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चावर एका बुरखाधारी बंदूकधाऱ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात ९ निदर्शक जखमी झाले.  
देशाच्या नवीन घटनेसाठी करण्यात येणाऱ्या जनमत चाचणीचा निर्णय राष्ट्रपती मुर्सी यांनी रद्द करावा, यासाठी विरोधकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या पाश्र्वभूमीवर तहरिर चौकात काढण्यात आलेल्या निषेध रॅलीवर गोळीबार करण्यात आल्यामुळे राजधानीतील परिस्थिती चिघळली आहे.
इजिप्तचे राष्ट्रपती मोहम्मद मुरसी यांनी स्वत:कडे सर्वाधिकार घेण्याचा निर्णय मागे घेतला असला तरी राज्यघटनेत नव्याने दुरुस्ती करण्याबाबत घेण्यात येणाऱ्या जनमत चाचणीचा वाद राजधानीत उफाळून आला आहे.
 राष्ट्रपती मुर्सी हे हुकूमशहासारखे वागत असल्याचा आरोप करीत घटनादुरुस्तीसाठी १५ डिसेंबर रोजी जनमत चाचणी घेण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.
या पाश्र्वभूमीवर इस्लामिस्ट मुस्लीम ब्रदरहूड आणि विरोधकांच्या समर्थकांमध्ये आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 3:29 am

Web Title: firing on demonstrator nine killed in kairo
टॅग Firing
Next Stories
1 गोव्यातील खाणउद्योग संकटात
2 बिहारमध्ये विषारी दारूचे आठ बळी
3 ‘तौतातीस’उल्का गेली पृथ्वीजवळून
Just Now!
X