26 September 2020

News Flash

चांद्रयान 2 ने पाठवलेला चंद्राचा पहिला फोटो पाहिलात?

चांद्रयान 2 ने पाठवलेले हे पहिले छायाचित्र आहे

चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिला फोटो पाठवला आहे. हा फोटो चंद्रापासून २६५० किमी अंतरावरुन काढण्यात आला आहे. चंद्राचं सौंदर्य किती अलौकिक आहे हेच दाखवणारा हा फोटो आहे.  चांद्रयान 2 ने त्याचा अवघड टप्पा २१ ऑगस्ट रोजी पार केला. चांद्रयान 2 हे चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. २१ ऑगस्टला सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली.

१४ ऑगस्टला हे यान चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. चांद्रयान २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम असून त्यात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय व खनिज शास्त्रीय माहिती यात मिळणार असून अनेक प्रयोग अपेक्षित आहेत. चांद्रयान १ च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. त्याचा पाठपुरावा आताच्या मोहिमेत केला जाणार आहे. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम) व रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो. आता याच चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिलावहिला फोटो पाठवला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 7:41 pm

Web Title: first moon image captured by chandrayaan2 vikramlander scj 81
Next Stories
1 आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी सरकारने असामान्य पावलं उचलण्याची गरज – निती आयोग
2 फ्रान्सला जाण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केला पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर
3 ”जम्मू-काश्मीरमधील अतिरिक्त सैन्य सध्या माघारी बोलवले जाणार नाही”
Just Now!
X