28 October 2020

News Flash

… तर तुम्हाला घरपोच सिंलिडर मिळवण्यासाठी येऊ शकते अडचण

१ नोव्हेंबर २०२० पासून असणार 'हा' नवा नियम!

संग्रहीत छायाचित्र

एलपीजी सिलिंडरच्या होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये पुढील महिन्यापासून महत्वपूर्ण बदल होत आहे. १ नोव्हेंबर २०२० पासून तुम्हाला घरपोच गॅस सिलिंडर मागवण्यासाठी ‘ओटीपी’ची आवश्यकता असणार आहे. रिपोर्टनुसार तेल कंपन्या गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकांच्या ओळखीसाठी नवी प्रणाली लागू करत आहेत. या प्रणालीस डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड(डीएसी) असं नाव देण्यात आलं आहे.

‘डीएसी’ सर्वप्रथम १०० स्मार्ट शहरांमध्ये लागू केला जाणार आहे. यासाठी अगोदरपासूनच राजस्थानची राजधानी जयपूर येथे एक पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. या व्यवस्थेअंतर्गत सिलिंडरच्या बुकींगनंतर ग्राहकाच्या नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. जो ओटीपी सिलिंडर घरी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यास दाखवल्यानंतरच ग्राहकास सिलिंडर मिळणार आहे.

कोणाला होणार अडचण ?
जर ग्राहकाचा मोबाईल क्रमांम अपडेट नसेल, तर सिलिंडर घरी आणून देणारा कर्मचारी एका अॅपद्वारे तो रिअल टाइम अपडेट करेल व कोडी जनरेट करेल. ही व्यवस्था लागू झाल्यावर त्या लोकांची अडचण होणार आहे. ज्यांचा मोबाईल क्रमांक चुकीचा आहे. चुकीच्या माहितीमुळे त्यांना गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणं बंद होऊ शकतं. १०० स्मार्ट शहारांनंतर अन्य शहरांमध्ये ही व्यवस्था लागू केली जाणार आहे. ही व्यवस्था कमर्शिअल सिलिंडरसाठी लागू नसणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 2:40 pm

Web Title: for lpg cylinders home delivery will need otp msr 87
Next Stories
1 बलिया हत्याकांड : फरार मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला लखनऊमध्ये अटक
2 फ्रीजमधील पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले करोनाचे सक्रिय विषाणू; चीनचा दावा
3 एटीएममधून ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास द्यावं लागणार अतिरिक्त शुल्क?
Just Now!
X