देशात मागील पाच वर्षे आणीबाणीपेक्षा वाईट काळ होता असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर आणि मोदींच्या कार्यकाळावर निशाणा साधला. मोदी सरकारची पहिली टर्म म्हणजे आणीबाणीपेक्षा वाईट काळ होता असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. १९७५ या वर्षी आजच्याच दिवशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्याच गोष्टीची आठवण सांगताना ममता बॅनर्जी यांनी देशात आणीबाणीपेक्षा वाईट काळ मागील पाच वर्षे होता असे म्हटले आहे.

आपण आपल्या इतिहासातून धडे घेतले पाहिजेत. ज्यामुळे लोकशाहीच्या हितांचे रक्षण करता येणे शक्य होते. ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी या कायमच मोदी सरकारविरोधात भूमिका घेतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते देशानं पाहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच वन नेशन वन इलेक्शन या विषयावरच्या चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले होते. मात्र त्या बैठकीलाही ममता बॅनर्जी गेल्या नव्हत्या. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याआधी जो शपथविधी सोहळा झाला त्यावरही ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार घातला. आता ममता बॅनर्जींनी आणीबाणीला ३६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जे ट्विट केलं आहे त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.