जम्मूमध्ये नुकतेच लष्करी जवानांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा भारतीय सुरक्षारक्षक शहीद झाले असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा जम्मूतील कठुआ गावात शस्त्रास्त्रांनी सज्ज असे पाच दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे.
सुत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार, दहशतवादी घुसल्याने सुरक्षारक्षकांकडून कठुआकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. पुन्हा एकदा हे सर्व दहशतवादी भारतीय लष्करी जवानांच्या गणवेशात असल्याची शक्यता आहे.
दहशतवादी घुसले असल्याची माहिती मिळताच लष्कर व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी कठुआ परिसरात दाखल झाले आहेत. जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश कुमार तसेच जम्मू-कठुआ विभागाचे मुख्य पोलिस अधिकारी शकील बैघ यांनीही परिसराची पाहणी केली. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार आम्ही शोधमोहिम सुरू केली आहे. गुरूवारी झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही सतर्कता बाळगत आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2013 रोजी प्रकाशित
जम्मूमध्ये घुसले पाच दहशतवादी; शोधमोहिम सुरू
पुन्हा एकदा हे सर्व दहशतवादी भारतीय लष्करी जवानांच्या गणवेशात असल्याची शक्यता आहे.

First published on: 28-09-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forces launch search for suspected terrorists in jk highway traffic stopped