18 January 2021

News Flash

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षांचा तुरुंगवास

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये भर

संग्रहित फोटो

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला मुलीला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लंडन मधील बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाने नवाज शरीफ यांना ८० लाख पाऊंडचा दंड  आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला २ लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने या संदर्भातला निर्णय एक आठवडा उशीराने द्यावा यासंदर्भातली याचिका नवाज शरीफ यांनी कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. एवनफिल्ड हाऊस मध्ये ४ घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे. पाकिस्तानच्या अकाऊंटिबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. लंडनमध्ये नवाज शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली. याच प्रकरणात आता त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. नवाज शरीफ यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या लंडनमध्ये आहेत. मात्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नाही तर मरियम शरीफ यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात आहे.

नवाज शरीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची चार प्रकरणे सुरु आहेत. पनामा पेपर प्रखरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या उच्च न्यायालायाने निर्णय दिल्यावर नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोने कोर्टात याचिका दाखल केली होती. पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले. आता त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आल्याने त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या अडचणीत भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 5:04 pm

Web Title: former pakistan pm nawaz sharif sentenced to 10 years and his daughter maryam sentenced to 7 years imprisonment in avenfield reference
Next Stories
1 ‘मशिदी या मजा म्हणून बांधल्या जात नाहीत’; राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडली बाजू
2 मुले पळवणारी टोळी समजून साधूंना मारहाण; जवानांमुळे अनर्थ टळला
3 सरन्यायाधीशांनाच खटल्यांच्या वाटपाचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
Just Now!
X