28 September 2020

News Flash

दिल्ली : चार मजली इमारत कोसळून एक ठार ; आणखी काही जण अडकल्याची भिती

बचावकार्य अद्याप चालू आहे.

 

दिल्लीच्या सीलमपूर भागातील जुनी चार मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य चालू केले. इमारतीखाली अनेक रहिवासी अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरूच होते. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य सहा जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 2:53 am

Web Title: four storey building collapse in seelampur abn 97
Next Stories
1 ‘चांद्रयान-२’मधून लँडर यशस्वीपणे विलग!
2 चिदम्बरम यांना तिहार तुरुंगात न पाठवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
3 आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर २.१ टक्क्यांवर
Just Now!
X