आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची कालीघाटमध्ये एक बैठक पार पडली. तीन तास चाललेल्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर जोर देण्याचे संकेत देण्यात आले. तसंच पक्षविरोधात होणाऱ्या कारवायांबाबतही त्यांनी कठोर शब्दात इशारा दिला. तसंच विरोधकांच्या संपर्कात असेलेल पक्ष सोडण्यास मुक्त आहेत, असंही त्यांनी सांगितलं. एनडीटीव्हीनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दरम्यान, या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. पंरतु पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या इशारा हा मंत्रिमंडळातून राजीनामा देणारे नेते शुभेंदु अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या काही अन्य आमदारांविरोधात होता. जर एक नेता पक्षातून बाहेर पडला तर त्यांच्यासारखे एक लाख नेते आपण तयार करू शकतो असं ममता बॅनर्जी म्हणाल्याचं पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी शुभेंदु अधिकारी यांचे वडील आणि पुरबा मेदिनीपुर टिएमसी प्रमुख तसंच कांथी येथील खासदार शिशीर अधिकारी यांच्याशीही चर्चा केली. तसंच पक्षविरोधी कारवाया आणि जिल्हा स्तरावरील विरोध संपवण्यास सांगितलं. शिशीर अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचं आश्वासन दिल्याचं एका नेत्यानं सांगितलं.

या बैठकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं म्हटलं. तसंच टीएमसीच्या शेतकऱी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी कृषी कायद्यांविरोधात मध्य कोलाकातातील महात्मा गांधी यांच्या प्रतीमेसमोर तीन दिवसीय आंदोलन करण्याचे निर्देशही त्यांनी दिली. तसंच पक्षविरोधी कारवाई सहन केली जाणार नसून विरोधकांच्या संपर्कात असलेले पक्ष सोडण्यासाठी मुक्त आहेत असंही त्या म्हणल्या.