फ्रान्सच्या पंतप्रधानांचे इस्रायलला आवाहन
वृत्तसंस्था, जेरूसलेम :- मोरोक्को सरकारने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या मोबाइलमध्ये पेगॅसस स्पायवेअर टाकून पाळत  ठेवली होती, असा आरोप असून याबाबत  मॅक्राँ यांनी इस्रायलचे पंतप्रधान नॅफ्ताली बेनेट यांना दूरध्वनीवरून विचारणा केली आहे. हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे, असे मॅक्राँ यांनी इस्राायलला बजावले आहे. पेगॅसस हे स्पायवेअर इस्राायलच्या एनएसओ  समूहाने तयार केले

असून त्याद्वारे भारतातीलही काही व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आली होती. जागतिक प्रसारमाध्यम महासंघाने गेल्या आठवड्यात अशी माहिती उघड केली होती, की किमान पन्नास हजार फोन हॅक करून त्यात पेगॅसस या सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यात आला. इस्राायलची सायबर सुरक्षा असलेल्या एनएसओ समूहाने पेगॅससची निर्मिती केली आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ व त्यांच्या मंत्रिमंडळातील पंधरा जणांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली होती, असे सांगण्यात आले. मॅक्राँ यांनी गुरुवारी बेनेट यांना दूरध्वनी करून असे सांगितले, की हा विषय गांभीर्याने घ्यावा. इस्राायलच्या चॅनेल १२ ने याबाबत शनिवारी सायंकाळी बातमी दिली होती.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले, की हे आरोप आपण अधिकारपदावर नसतानापासूनचे आहेत, पण  याबाबत चौकशी करण्यात येईल.

मॅक्राँ यांनी म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षा यंत्रणेची तातडीची बैठक घेऊन, याबाबत ठोस माहिती देण्यात यावी, कारण पेगॅसस स्पायवेअरचा गैरवापर करण्यात आला आहे. मोरोक्कोच्या सरकारने मॅक्राँ यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप फेटाळला असून एनएसओ समूहानेही फ्रान्सच्या अध्यक्षांना लक्ष्य बनवण्यात आल्याचा इन्कार केला आहे.

‘एनएसओ’ चौकशी करणार

एनएसओ समूहाचे अनुपालन अधिकारी चेम गेलफँड यांनी सांगितले, की मॅक्राँ यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती की नाही याबाबत आम्ही ठोस माहिती देऊ. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांचे अनेक फोन असून ते नेहमी फोन बदलत असतात, त्यामुळे त्यांच्या फोनमध्ये स्पायवेअर टाकले असण्याची शक्यता कमी असल्याचे निकटवर्ती सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या सगळ्याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुरुवारी इस्राायलने समिती नेमली आहे.