इंधन दरवाढीला काल (बुधवारी) एक दिवसाचा ब्रेक बसल्यानंतर आज पुन्हा एकदा इंधानांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या किमतीत 13 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 11 पैशांनी वाढ झाली. परिणामी, मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना 88.39 रुपये मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी 77.58 रुपये द्यावे लागतील. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 81.00 रुपये झाला आहे, तर डिझेल प्रति लिटर 73.08 रुपये झालं आहे.
Petrol at Rs 81.00/litre (increase by Rs 0.13/litre) and diesel at Rs 73.08/litre (increase by Rs 0.11/litre) in Delhi. Petrol at Rs 88.39/litre (increase by Rs 0.13/litre) and diesel at Rs 77.58/litre (increase by Rs 0.11/litre) in Mumbai. pic.twitter.com/hbCt2l0IJ7— ANI (@ANI) September 13, 2018
सलग सतरा दिवसांच्या दरवाढीनंतर बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे आणि देशातील ५ राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोलच्या किंमतींवर केंद्र सरकार नियंत्रण करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही.