News Flash

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी १००० कोटींचा निधी जमा

केवळ दीड महिन्यांत मिळाचा चांगला प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीनं देशभरात देणगी मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सध्या सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा झाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने या ट्रस्टचे काम चालते. १५ जानेवारीपासून या ट्रस्टने देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला. याद्वारे आत्तापर्यंतच केवळ दीड महिन्यातचं ट्रस्टकडे १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

राम मंदिराचे फोटो आले समोर, पाहा कसं असेल मंदिर

विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, “दक्षिण भारतातील जनतेनं या मोहिमेला देलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. निधी गोळा करायच्या कामासाठी मी मोठा प्रवास केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे. निधीमध्ये वाढ होणं ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही. तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचं या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.”

सर्व मंदिरं संरक्षित करावी

राज्यातील सर्व मंदिरं ही संरक्षित करावी अशी मागणी पेजवर यांनी केली आहे. कारण यामुळे मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण करण्याचा कोणी विचार करणार नाही आणि त्यामुळे भविष्यात वाद होणार नाहीत, असं विश्वप्रसन्न महाराज यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ६० वर्षांपासून गुहेत राहणाऱ्या बाबांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी दिले एक कोटी रुपये

जातीवर आधारीत आरक्षण चुकीचं

विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, “जातीवर आधारित आरक्षण देणं हे चुकीचं आहे. आरक्षण हे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर देण्यात यावं. प्रत्येक समजातील लोकांनी त्यांच्या जातीला विशेष दर्जा देण्याविरोधात आवाज उठवायला हवा.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:00 pm

Web Title: fund collection from ram temple in ayodhya nets 1000 crore says pejavar seer aau 85
Next Stories
1 …ही गोष्ट करोना महामारीपेक्षाही गंभीर; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2 #आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं Top Trending हॅशटॅग; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याला होतोय विरोध
3 औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ; मुंबईतील चिमुकलीला पंतप्रधान मोदींनी केली मदत
Just Now!
X