24 January 2021

News Flash

धक्कादायक… Game of Thrones च्या निर्मात्याची हत्या; चहामधून देण्यात आलं विष

ते ७६ अब्ज ६० कोटी रुपये इतक्या संपत्तीचे मालक होते

(फोटो सौजन्य : Yoozoo Global वरुन साभार)

गेम डेव्हलपर योझू कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लिन ची यांचा ख्रिसमसच्या दिवशी मृत्यू झाला. लिन ची हे जगभरामध्ये गेम ऑफ थोन्स या गेमचे निर्माते (डेव्हलपर) म्हणून ओळखले जायचे. तसेच सध्या ते नेटफ्लिक्सवरील चित्रपटांचे निर्माता म्हणूनही नावारुपास आले होते. लिन हे अवघ्या ३९ वर्षांचे होते. प्राथमिक तपासामध्ये लिन ची यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने लिन ची यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लिन यांना चहामधील साखरेतून विष देण्यात आलं. शंघाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिन ची यांचे सहकारी जू याओ यांना या प्रकरणामध्ये प्रमुख संशयित असल्याचे दिशेने पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केलाय. अटक करण्यात आलेल्या जू याओ यांनी युझूच्या चित्रपट निर्मिती विभागाचे प्रमुख आहेत.

हुरुन चायनाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये लिन ची यांची एकूण संपत्ती ६.८ बिलियन युआन म्हणजेच ७६ अब्ज ६० कोटी रुपये इतकी आहे. शुक्रवारी लिन यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या कंपनीचे अनेक माजी कर्मचारी आणि चाहते शोक व्यक्त करण्यासाठी योझूच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते.

लिन ची हे चीनमधील गेमिंग बाजारामधील एक लोकप्रिय व्यक्ती होते. ते चित्रपट निर्मिती क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांनी २००९ साली योझू कंपनीची स्थापना केली. त्यानंतर अगदी यशस्वीपणे आपल्या कंपनीचे नेतृत्व केलं. मोबाईल गेमिंग आणि गेमिंग क्षेत्रामध्ये लिन ची यांनी चांगलं नाव कमावलं होतं आणि आपली नवी ओळख निर्माण केली. योझू ही गेम डेव्हलपर आणि ब्राउझर तसेच मोबाइल गेम पब्लिशर आहे. ही कंपनी प्रामुख्याने आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये व्यापार करते. गेम ऑफ थ्रोन्स हा ऑनलाइन मल्टीप्लेयर गेम आहे. गेम ऑफ थ्रोन्स हा गेम जीटीअ‍ॅक्रेडने तयार केला आहे. २०१४ मध्ये शेन्जेन स्टॉक एक्सेंजमध्ये ही कंपनी लिस्टेड झाली.

कंपनीनेही लिनच्या मृत्यूनंतर एक भावनिक पत्र प्रकाशित करुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. विबो या चीनमधील लोकप्रिय वेबसाईटवर गुडबाय यूथ असं म्हणत लिनला श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 6:00 pm

Web Title: game of thrones games maker chinese tycoon lin qi dies after poisoning scsg 91
Next Stories
1 कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर, सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद
2 Cyber Crime: एकावर एक थाळी फ्री देत असल्याचे सांगत फेसबुकवरुन महिलेला घातला ५० हजारांचा गंडा
3 “कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी मनमोहन सिंग, शरद पवारांवर होता दबाव”
Just Now!
X