येथील रामनगर भागात एका चौदा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून चारजणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचे काल शाळेतून घरी परतत असताना अपहरण करण्यात आले असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलदीप नारायण यांनी सांगितले. ते म्हणाले की, अकबर, जबीर व इक्बाल यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर गावात तणावाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.