महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला एका आरोपी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ज्या दिवशी करण्यात आली त्या दिवशी लंकेश यांच्या घराच्या परिसरात हजर असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केला आहे.

कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने लंकेश यांच्या घराच्या जवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना सुधन्वा गोंधळेकर याच्यासारखी दिसणारी व्यक्ती लंकेश यांच्या हत्येपूर्वी तेथे जवळपास चार तास हिंडताना दिसत होती. ३९ वर्षीय गोंधळेकर याला महाराष्ट्र एटीएसने १० ऑगस्ट रोजी अटक केली. लंकेश हत्येमध्ये गोंधळेकर याची भूमिका काय होती याचा तपास सुरू आहे. हे फुटेज पृथ्थकरणासाठी पाठविल्याचे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.