१२ नोव्हेंबरला गज वादळचा फटका तामिळनाडूला बसला. यामध्ये तंजावर जिल्ह्यातल्या अनाईक्कडू गावात एका १२ वर्षांच्या मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. मासिक पाळी आल्याने घराबाहेर झोपणं तिच्या जिवावर बेतलं कारण गज वादळात या मुलीचा मृत्यू झाला. ही मुलगी सातवीत शिकत होती. तिला मासिक पाळी आल्याने तिला घराबाहेर असलेल्या खोलीत झोपण्यास सांगण्यात आले. मात्र त्यावेळी जे वादळ आले त्या वादळात एक नारळाचे झाड तिच्या घरावर पडले. याच दुर्घटनेत या मुलीचा मृत्यू झाला. तिची आई तिच्यासोबत तिला सांगण्यात आलेल्या खोलीत झोपली होती. या दोघीही दुर्घटनेत जखमी झाल्या. त्यानंतर या मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

या मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. त्यानंतर तिला घराबाहेरच्या खोलीत झोपण्यास सांगण्यात आले होते. मुलीला मासिक पाळी आल्यानंतर तिला घराबाहेरच्या खोलीत बसवले जाते अशी प्रथाच या ठिकाणी आहे. मात्र ही प्रथाच या मुलीच्या जिवावर बेतली आहे. जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा तिला तिच्या घराबाहेर असलेल्या छोट्याश्या खोलीत किंवा झोपडीत एक आठवडा रहावे लागते. ही प्रथाच तिथे आहे. सात दिवसांनी या मुलीला घरात घेतले जाते. मात्र ही प्रथाच या मुलीच्या जीवावर बेतली आहे. या मुलीचे नाव विजया असल्याचे समजते आहे. द न्यूज मिनिटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गज वादळाचा फटका तामिळनाडूला बसला. मात्र या मध्ये विजया नावाच्या मुलीचा मृत्यू एका प्रथेमुळे होणं ही दुर्दैवी घटना आहे असे सेफ अॅक्टीव्ह पिरियड्स अवेअर इंडिया या प्रकल्पाच्या प्रमुख काव्या मेनन यांनी म्हटले आहे. ज्या समाजाने ही प्रथा तयार केली तो पूर्ण समाज या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे असेही मेनन यांनी म्हटले आहे. अनेकदा मुलींना त्या खोलीत एकटेच ठेवले जाते. हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य नाही. गज वादळापेक्षाही ज्या समाजाने ही रुढी आखली तो समाजच या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे असेही मेनन यांनी म्हटले आहे. गज वादळामुळे आत्तापर्यंत ४५ जणांचा बळी राज्यभरात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.