News Flash

प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीने हात न सोडल्याने बचावला

वसईतीन नायगावमध्ये असलेल्या नक्षत्र टॉवरमध्ये ही घटना घडली आहे

प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीने हात न सोडल्याने बचावला

वसईत एका तरूणाने टोलेजंग इमारतीच्या छतावरून आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. मात्र उडी मारताच क्षणाचाही विलंब न करता त्याच्या प्रेयसीने त्याचा हात पकडून ठेवला. सुमारे १५ मिनिटे तिने त्याचा हात पकडून ठेवला ज्यामुळे हा तरूण बचावला आहे. रियाझ अहमद अन्सारी असं या तरूणाचं नाव आहे. या तरूणाला त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीने वाचवलं आहे. रियाझ हा नायगाव भागात असलेल्या नक्षत्र टॉवरमध्ये राहात होता. रियाझने या इमारतीच्या छतावरून आपले आयुष्य संपवण्यासाठी उडी मारली मात्र त्याच्या प्रेयसीने तातडीने त्याचा हात धरला आणि पंधरा मिनिटे त्याचा हात धरून ती उभी राहिली त्याला समाजवले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले ज्यामुळे हा तरूण बचावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 9:12 pm

Web Title: girlfriend saved her boy frined from suicide in vasai
Next Stories
1 ‘दिल्लीची जामा मशीद पाडा, मूर्ती सापडल्या नाहीत तर मला फासावर लटकवा’
2 राहुल गांधींनी कधी शेतात बैल जुंपलेत का?-अमित शाह
3 मोफत तांदूळ दिल्याने लोकं आळशी: मद्रास हायकोर्ट
Just Now!
X