News Flash

गोवा भाजपाची वेबसाइट हॅक, लिहिलं ‘पाकिस्तान जिंदाबाद’

भारतीय जनता पक्षाचं गोव्याचं संकेतस्थळ हॅक

भारतीय जनता पक्षाचं गोव्याचं संकेतस्थळ हॅक झालं आहे. हॅकर्सनी भाजपाच्या या संकेतस्थळावर पाकिस्तान जिंदाबाद अशा आशयाचा मेसेज लिहिला आहे. सोमवारी (१५ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास ही वेबसाईट हॅक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गोवा भाजपाचं http://www.goabjp.org हे संकेतस्थळ हॅक झालं आहे. संकेतस्थळ हॅक झाल्यानंतर त्यावर पाकिस्तान झिंदाबाद या मेसेजसह catch.if.you.can@Hotmail.com हा मेल आयडी दिसत होता, तसंच त्यासोबत मोहम्मद बिलाल असं नावही होतं. मात्र, आता संकेतस्थळाला भेट देण्याचा प्रयत्न केला असता त्यावर संकेतस्थळाचे काम सुरू असल्याकारणाने संकेतस्थळ बंद आहे अशा संदेश दिसत आहे. भाजपाची बेबसाईट नेमकी कोणी हॅक केली याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. तसंच भाजपाकडूनही अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीर भाजपाचं संकेतस्थळही हॅक करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:19 pm

Web Title: goa bjp website hacked with pakistan zindabad message on it
Next Stories
1 अबब ! स्टाफ मीटिंग सुरु असताना छतावरुन पाच फूट अजगर पडला खाली
2 ‘पाकिस्तानऐवजी भारताला राफेल विमान मिळाल्याने राहुल गांधी नाराज’
3 मित्राच्या आई बरोबर प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला शेजाऱ्यांनी दिला चोप
Just Now!
X