नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तऐवज मिळविण्यासाठी भारताने जपान, रशिया आणि ब्रिटनसह अन्य अनेक देशांशी संपर्क साधला असून त्यापैकी काही देशांनी त्याला प्रतिसाद दिला असल्याची माहिती बुधवारी राज्यसभेत देण्यात आली.
नेताजींशी संबंधित दस्तऐवज मिळविण्याचा प्रश्न ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली, जपान, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका सरकारकडे मांडण्यात आला आहे, असे गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी सांगितले.
रशिया, जपान, जर्मनी आणि ब्रिटनकडून त्याला प्रतिसाद मिळाला आहे, तर ऑस्ट्रिया, इटली आणि अमेरिकेकडून प्रतिसाद प्रलंबित आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.
नेताजींबाबतच्या उपलब्ध असलेल्या सर्व फायली सरकारने खुल्या केल्या असून त्या राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाकडे कायमस्वरूपी जतन करण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.