News Flash

आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय

आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानेही नव्या करोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. मात्र, त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून करोनाच्या नव्या विषाणूनं देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या आज (३० डिसेंबर) २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:27 pm

Web Title: govt of india extends suspension of scheduled commercial international flights till jan 31 2021 scj 81
Next Stories
1 “तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत”
2 मैसूरच्या शेतकऱ्याची कमाल ! एक एकराच्या जागेत घेतो ३०० प्रकारची पिकं
3 नितीश कुमार यांचं सरकार संकटात?; ‘जदयू’चे १७ आमदार ‘राजद’च्या वाटेवर
Just Now!
X