गुजरातमधील काँग्रेस कमकुवत असल्याचे स्वत: पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मान्य केले आहे.
राहुल गांधी म्हणाले, “गुजरातमधील काँग्रेस कमजोर असल्याचे मान्य आहे. सध्या काही ‘डोस’ देण्याची गरज आहे आणि ते जर यशस्वी झाले तर, काही मोठ्या शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही”
गुजरातमध्ये काँग्रेसला येणारे अपयश दूर करता येण्यासारखे आहे. मात्र, त्यासाठी पक्षात मोठ्या बदलांची गरज नाही. फक्त काही छोट्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. असा राहुल गांधी यांचा प्रतिक्रियेमागील मानस होता.
आपल्या दोन दिवसीय गुजरात दौऱयावर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्य़कर्त्यांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक कार्य़कर्त्याने आपले विचार समोर येऊन मांडणे गरजेचे आहे आणि तेथील काँग्रेस नेतृत्वाने सध्याच्या दर सहा महिन्यातून एकदा दिली जाणारी भेट टाळून, दर महिन्याला भेट देणे गरजेचे आहे. असा उपदेशात्मक सल्लाही राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिला.